The गडविश्व
गडचिरोली : शहरातील नळधारकांना आता लवकरच नळाचे बिल येणार आहे. शहरातील नळांना आता मीटर लावण्यात येत आहे. यामुळे आता नळधारक पाण्याचा आवश्यतेनुसारच पाण्याचा वापर करावा लागणार आहे. जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल येणार आहे.
शहरात पाण्याचा अपव्यय वाढला होता अनेक नळांना तोट्या नव्हत्या त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मिटर लावण्याची मागणी करण्यात येत होती. आता ही मागणी पुर्ण झाली असून आता शहरातील नळांना मिटर लावण्यास सुरूवात झाली आहे. आता पाण्याचा जेवढा वापर तेवढा बिल येणार आहे. यामुळे आत नळ धारक ठरवणार पाण्याचा वापर किती करायचा.