फुलनार चकमकीची चौकशी सुरू : नागरिकांच्या निवेदनांना आमंत्रण

33

The गडविश्व
गडचिरोली, दि.१६ : एटापल्ली तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत शहीद झालेल्या पोलीस जवान महेश कवडू नागुलवार यांच्या मृत्यूबाबत दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेतील सत्यता उघडकीस आणण्यासाठी आणि मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना या घटनेबाबत प्रत्यक्ष माहिती आहे किंवा जे चौकशीस मदत करू इच्छितात, त्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.
सत्य समोर यावे आणि योग्य न्यायप्रक्रिया घडावी यासाठी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची असून, जनतेच्या सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here