– पक्ष संघटनेला नवे बळ
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २० : भारतीय जनता पार्टीच्या धानोरा तालुकाध्यक्षपदी साजन गुंडावार यांची अधिकृत नियुक्ती आ 20 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली. पक्ष संघटनेच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रसंगी आमदार मिलिंद नरोटे, प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अनंत साळवे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष साजन गुंडावार यांचं अभिनंदन करताना उपस्थित नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास व्यक्त करत, आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
धनोरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील स्थानिक व राज्यस्तरीय राजकीय घडामोडींमध्ये गुंडावार यांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
