– नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ निष्पाप पर्यटकांना गडचिरोलीतील कारगील चौक स्मारक येथे आज २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून, या क्रूर हत्याकांडाचा तीव्र निषेधही यावेळी करण्यात येणार आहे.
या हल्ल्यात मृत्यू पावलेले नागरिक देशभक्त होते, त्यांच्यासाठी मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात येईल. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांप्रती आदर व्यक्त करावा आणि दहशतवादाचा निषेध करावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.
सर्व नागरिकांनी मेणबत्त्या घेऊन कारगील चौकात उपस्थित राहावे, ही विनंती त्यांनी केली आहे.
