– २२ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा केला निर्धार
The गडविश्व
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजपुर पॅच येथे मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवरील व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २२ रुग्णांनी उपचार घेतला व दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिक घेण्यात येते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. नुकतेच राजपुर पॅच येथेही गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २२ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना साईनाथ मोहुर्ले यांनी समुपदेशन केले. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. तसेच दारूचे दुष्परिणाम व धोक्याचे घटक रुग्णांना सांगितले. शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच मिना वेलादी, उपसरपंच सविता कोकिरवार, माजी सरपंच सुरेश गंगाधीरवार, बोरीचे उपसरपंच पराग ओलालवार, ग्रापंचे कर्मचारी प्रवीण शेंडे , मुक्तिपथ तालुका प्रेरक आनंद कुमरी यांनी सहकार्य केले.