The गडविश्व
मुंबई : रशिया- युक्रेन युद्ध सुरु आहे. मात्र, या युद्धाचा परिणामामुळे भारतात मोठे पडसाद उमटणार आहेत. युक्रेन – रशियाच्या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. कच्चे तेल आणि सोने महाग होण्याची शक्यता अधिक आहे. याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली की, यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतात. तर एलपीजी, केरोसीन यांचे अनुदान वाढू शकते. रशिया-युक्रेन युद्धाचे पडसादामुळे कच्चे तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्यावर गेले आहे. गेल्या ७ वर्षांतला उच्चांक आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीवर याचा परिणाम होणार आहे.
रशिया – युक्रेन युद्ध घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात कमालीची घसरण झाली असून व्यवहार सुरू होताच निफ्टी तब्बल ५०० अंकांनी कोसळला तर सेन्सेक्स जवळपास १६०० अंकांनी कोसळला. तर दुसरीकडे सोने दरातही वाढ झाली आहे. सोने दरात वृद्धी झाली असून सोन्याची वाटचाल ५२ हजारांच्या दिशेने पोहोचली आहे.