– कमलापूर, राजाराम, खाँदला येथील पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
The गडविश्व
अहेरी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात प्लस पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने आज अहेरी तालुक्यातील राजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे अहेरीचे पं.स.सभापती भास्कर तलांडे यांनी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओ चा डोस पाजून पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी कमलापूर, राजाराम, खाँदला येथील पल्स पोलियो लसीकरण मोहिमेदरम्यान पं . स. सभापती हे उपस्थति राहून शुभारंभ केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकदर, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे, अँड. एच.के.आकदर, वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर, नामदेव पेंदाम, आरोग्य विभागाचे अधिकारी नितीन धकाते, कुंभारे, रामटेके व कर्मचारी उपस्थित होते. राजाराम येथे ५८ बालकांना पोलिओ डोज देण्यात आले.