गडचिरोली जिल्हयातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

5483

– मंदिरामध्ये ५० लोकांच्या मार्यादेत धार्मीक कार्यक्रम करण्यास परवानगी

The गडविश्व
गडचिरोली : कोविड -१९ च्या अनुषंगाने जिल्हयात महाशिवरात्री निमीत्त भरणाऱ्या सर्व यात्रा जत्रा रद्द करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजय मीणा यांनी आज २७ फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहे. तर सदर मंदिरामध्ये ५० लोकाच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हयातील कोरोना रूग्णांची संख्या कमी दिसु लागली आहे मात्र विशेषतः मार्कंडादेव, चपराळा येथील तसेच इतर ठिकाणी भरणाऱ्या यात्रा जत्रांचा विचार करता १ मार्च २०२२ पासून महाशिवरात्री निमित्त यात्रा जत्रा भरल्यास मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी होवून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ८ जानेवारी 2022 च्या शासन निर्देशाप्रमाणे कोविड १९ साथरोग संदर्भाने तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ उक्त आदेशानुसार वेळोवेळी सुरू केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भान उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रा जत्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजय मीणा यांनी आज २७ फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहे. तथापि सदर मंदिरामध्ये ५० लोकाच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी असणार आहे. या आदेशाची अमंलबजावणी करण्याचे जबाबदारी संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांची असणार आहे. सदर आदेशाचे पालन न करणारी उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ , आपत्ती व्यवस्थापन २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

यात्रा-जत्रा मनाई आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here