जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलिबाल स्पर्धेचे उद्घाटन

206

– जय सेवा बिरसामुंडा क्रीडा मंडळ तलवाडाच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं मेडपल्ली अंतर्गत तलवाडा येथे जय सेवा बिरसामुंडा क्रीडा मंडळ तलवाडाच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.
यावेळी उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. प. मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, पेरमल्लीच्या सरपंचासौ.किरण ताई नैताम, पेरमल्लीचे विद्यमान ग्रा.प.सदस्य तथा माजी सरपंच प्रमोद आत्राम, प्रतिष्टित नागरिक सुरेश गावडे, सुकृ पोदाळी, वनरक्षक भोयर, राजू बोम्मनवार, तुलशिराम चंदनखेळे, संतोष आत्राम, विट्टलजी वेलादी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष टिंकू सलम, उपाध्यक्ष अशोक तेलामी, सूरज आत्राम , कोषाध्यक्ष दीपक गावडे, सचिव दीपक वेलादी, क्रीडा प्रमुख आकाश मडावी, सुधाकर पोदाळी, अमोल तेलामी याचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here