– दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज
The गडविश्व
चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागा अंतर्गत येत असलेल्या नागभिड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोडाझरी अभयारण्यातील बफर क्षेत्रात, हुमा बिटात आज सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. सदर वाघ हा वयस्क असल्याचे कळते. वाघाच्या शरीरावर जखमा होत्या त्यामुळे वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत वाघ हा याच परिसरात वावरनारा (T-11) पुर्ण विकसित नर वाघ असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून वाघाचे शवविच्छेदन डॉ. गभने, रामटेके यांनी केले व त्यानंतर वाघाचे दहन करण्यात आले.
यावेळी वन विभागाचे उप वनसंरक्षक दीपेश मलोत्रा, सहाय्यक वनसंरक्षक वाकडे, ब्रम्हपुरी वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड, झेप निसर्ग संस्था नागभीड, इको प्रो प्रतिनिधी चंद्रपूर घटनास्थळी उपस्थित होते.