The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील मोयाबीनपेठा येथे युवा क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित नागरिकांना आणि खेळाडूंना क्रीडाविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषदेकडून रेगुंठा आणि मोयाबीनपेठा परिसरात निधी उपलब्ध करून विबिध विकासकामे करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विद्यार्थी संघटना सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, ग्राम पंचायत गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे होते. विशेष अतिथी म्हणून पोलीस स्टेशन रेगुठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप, सागर पटील, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडी, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, उपसरपंच शंकर वेलादी, शंकर रत्नम, वेंकन्ना दुर्गम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी पाटील, रविंद्र आत्राम, चंद्रय्या तोडसम, नामदेव कोडापे, नवीन पनगंटी, वेंकन्ना जाकावार, स्वामी जाकावार, श्रीनिवास चिलकामारी, राजू पुप्पालवार, संतोष जाकावार, आविस अहेरी शाखेचे अध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक, गणेश रच्चावार, आविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला होते.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार ३० हजार रोख रक्कम जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचेकडून तर द्वितीय पुरस्कार २० हजार रोख रक्कम आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांचेकडून, तृतीय पुरस्कार १० हजार रुपये रोख रक्कम स्व. रुपेश जाकावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ युवा क्रिकेट क्लब मोयाबीनपेठा यांचेकडून देण्यात आले आहे.