The गडविश्व
गडचिरोली : राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उद्या 3 ते 5 मार्च पर्यंत अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता सब ज्युनिअर मुला व मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राच्या ५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली येथील टीम आज २ मार्च रोजी अकोला येथे स्पर्धेकरिता रवाना झाली आहे.
गडचिरोली बॉक्सिंग केंद्रामधून निवड झालेल्यांमध्ये मुलांमध्ये ४३ किलो वजन गटात रितेश गोपल करंगामी, ६१ किलो वजन गटात तन्मय सोमा करेवार, तर मुलीनं मध्ये ३४ किलो वजन गटात गुंजन गिरीधर बांते, ४४ किलो वजन गटात युगंधारा कांतीचंद पुराम, ४८ किलो वजन गटात नरेंद्र भरडकर यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत संघ प्रशिक्षक म्हणून पंकज मडावी यांची निवड करण्यात आली आहे .
खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे सचिन, यशवंत कुरुडकर जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड, क्रीडा अधिकारी संदीप खेब्रागडे, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार यांनी शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, निखिल इंगडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना संजय मानकर, अक्षय कोवासे, प्रवीण मेश्राम तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.