नागपुरात सीबीआयची मोठी कारवाई : वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यासह चार्टर्ड अकाउंटटला लाच स्विकारतांना घेतले ताब्यात

326

– चार लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारतांना घेतले ताब्यात

The गडविश्व
नागपूर : येथे सीबीआयने वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यासह चार्टर्ड अकाउंटटला चार लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर सीबीआयकडून आरोपींच्या घराची झडती सुरू असल्याचे कळते.
तक्रारदार यांच्याकडून वस्तू व सेवा करच्या कामानिमित्त चार्टर्ड अकाउंटटने चार लाखांच्या लाच रकमेची मागणी केली. मात्र तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मनाई केली. संबंधित प्रकरणावरून पोलीस आयुक्ताने कर दायित्वाशी संबंधित नोटीस तक्रादाराला पाठवली. हे संपूर्ण प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी चार्टर्ड अकाउंटंट आणि सहायुक्ताने साडेचार लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर तक्रादाराने लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सीबीआयला रीतसर तक्रार नोंदविली. तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआयने आरोपीविरुद्ध सापळा रचला. व लाच रक्कम स्वीकारतांना आरोपीस रंगेहाथ पकडले. सीबीआयकडून आरोपींच्या घराची झडती घेणे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here