महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती निधीतून ३५५ कोटींचा निधी मंजूर

248

The गडविश्व
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी 1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्ष 2021 मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी या पाच राज्यांना 1,664.25 कोटी आणि पुद्दुचेरीला 17.86 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.
केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here