पं. स. कुरखेडा येथील गटविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा

195

– जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे गावकऱ्यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली : पंचायत समितीच्या सभेत पारित झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे, मनमर्जीने कारभार करणे, अधिनस्त कर्मचाऱ्यांना अपमानजनक वागणूक देणे यासारख्या विविध आरोप करीत कुरखेडा पंचाय समितीच्या उपसभापती व सदस्यांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ए.के.तेलंग यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना जि. प. सदस्य प्रल्हाद कुल्हाडे, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, मनोज ठुनेदार, कविता गुरुनुले, वर्षा कोकाडे, माधुरी मडावी, शारदा पोरटी उपस्थित होते.
तक्रारीमध्ये म्हटले आहे कि, गट विकास अधिकारी ए.के.तेलंग यांच्याबाबतीत पंचायत समिती सभेत वारंवार रामगडच्या ग्रामसेविकेच्या कामाची चौकशी करून बदलीबाबत पंचायत समिती स्तरावरील १५ व्या वित्त आयोगाच्या अमलबजावणीबाबत महागु मेश्राम, ट्रायसेम कर्मचारी यांचे मानधन काढणे या विषयी वारंवार सभेमध्ये मुद्दे उपस्थित करीत आहेत. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याची समजूत आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी श्रीमती तेलंग यांचेविरूध्द त्यांचा अविश्वास आहे. यावर सभाध्यक्षांनी सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना आपले मत व्यक्त करण्यास सांगितले असता प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून पाठींबा दर्शविला. यावर गट विकास अधिकारी श्रीमती तेलंग यांनी आपले मत व्यक्त करण्यास मनाई केली असतांनासुध्दा त्यांनी ठरावामध्ये आपल्या स्वमर्जीने मत नोंदविले. त्यामुळे त्यांनी सभागृहाची दिशाभूल केलेली आहे. गट विकास अधिकारी श्रीमती तेलंग यांनी सभाध्यक्ष, सर्व सदस्य व सभागृहाचा अवमान केला असून एकप्रकारे लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी यांना निलंबित करून बदली करण्यात यावी व ठराव कायम करण्यात यावे तद्वतच ग्रामसेवकांनासुध्दा त्रास होत असल्यामुळे ग्रामसेवक संघटनांनी गट विकास अधिकारी, विभागीय आयुक्त, नागपुर विभाग नागपुर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन देऊन गट विकास अधिकारी हे ग्रामसेवकांच्या मासिक व पाक्षिक सभेमध्ये अरूण कन्नाके, ग्राम विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सभागृहात सर्वासमोर कौटुंबिक बाबीवर जाहीरपणे बोलणे, शुल्लक कारणावरून ग्रामसेवकांना धमकीवजा बोलणे, ग्रामसेविका कु. रोजलीन खोब्रागडे यांना वारंवार त्यांच्या ग्रामपंचायती फेरबदल करून एक वर्षात ३ ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठांची परवानगी न घेता स्थलांतरीत केल्याने व अपमानीत केल्याने मानसिक ताण येवून तिला पक्षघाताचा आजार झाला. अशा प्रकारची अनेक बाबी नमुद केलेल्या आहेत. तद्वतच पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेमध्ये गट विकास अधिकारी यांचे विरोधात घेतलेल्या निर्णयाचे अनुषंगाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सुध्दा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतू अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नसल्याने आमचेसुध्दा मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे आपण ५ दिवसाचे आत कार्यवाही करावी अन्यथा सर्व पदाधिकारी सामुहीक राजीनामे देऊन उपोषणाला बसणार असा इशारा निवेदन देतांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here