नागपूर : पोलिसांनी कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा केला पर्दाफाश

1249

– रोकड मोजण्यासाठी पोलिसांना मागवावी लागली मशीन
The गडविश्व
नागपूर : येथील कुंभरपुऱ्यात पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. यात कोट्यवधीं रुपये पोलिसांच्या हाती लागले आहे. या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून हवालाचे ४ कोटी २० लाख रुपयांची रोकड जप्त करत तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे.
देशात हवाला रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. नागपूरमध्ये कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत महाल परिसरात इंद्रायणी साडी सेंटरच्या मागे कुंभरपुऱ्यात एका घरी छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.
रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. छाप्यात सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना मशीन मागवावी लागली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here