The गडविश्व
गडचिरोली : एटापल्ली शहरातील व लगतच्या गावातील अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी दारू व तंबाखू विक्रीबंदी शहर संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन एटापल्ली पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. मात्र, एटापल्ली शहरातील काही वार्डात व लगतच्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरु आहे. त्यामुळे वार्डातील व लगतच्या गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करीत शहरातून अवैध दारूविक्री हद्दपार करावी, अशी मागणी दारू व तंबाखू विक्रीबंदी शहर संघटनेने केली आहे. पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करतांना संघटनेच्या सदस्यांसह विविध वॉर्डातील महिला व नागरिक उपस्थित होते.
