पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ३५ महिलांना मिळाले ब्युटीपार्लर व्यवसाय सुरु करण्याचे साहित्य

423

– गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार, ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन गरजु युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ०१ महीण्याचे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली पोलीस दल व बीओआयआरसेटी यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आज ०८ मार्च २०२२ रोजी ब्युटीपार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गडचिरोली जिल्हयातील दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवतींकरीता प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम तसेच महीला दिनाच्या पार्श्वभुमीवर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन बीओआय आरसेटी कार्यालयात करण्यात आले होते.
गडचिरोली पोलीस दल व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्वयंरोजगार मेळाव्यास एकुण ३५ बेरोजगार महीला प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग स्वयंरोजगार मेळाव्यात नोंदवला. यावेळी यशस्वीरीत्या ब्युटीपार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या ३५ महीला उमेदवारांना ब्युटीपार्लर व्यवसाय सुरु करण्यासाठी ब्युटीपार्लर चेअर, प्रशस्तीपत्र व इतर साहीत्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महीला दिनाच्या पार्श्वभुमीवर आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमातील सहभागी कलावंतानी आपल्या कला सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे आजपर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४०, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटीं असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४०० युवक / युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपॉर्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ३४३, बदक पालन १०१, शेळीपालन ६७, लेडीज टेलर १०५, फोटोग्रॉफी ३५, टु व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, मधुमक्षिका पालन ३२, भाजीपाला लागवड ३२६, टु/ फोर व्हीलर प्रशिक्षण ३७० व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ५८० अशा प्रकारे एकुण २५०० युवक/युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.ब्युटीपार्लर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच महीला दिनानिमीत्य शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील स्वयंरोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भर बनून स्वतःचे जीवनमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अहेरी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन बीओआय आरसेटीचे संचालक चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम , पुरुषोत्तम कुनघाडकर यशस्वी उद्योजक श्रीमती ज्योती उंदीरवाडे, मार्गदर्शिका श्रीमती संध्या कोतकोंडावार हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/ उपपोस्टे/ पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here