– जखमींना रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
The गडविश्व
जम्मू काश्मीर : येथील उधमपूर शहरातील सलाथिया चौकात एक संशयास्पद स्फोट झाला झाल्याची घटना घडली आहे . या स्फोटात एकाचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्कराचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी दस्खल होत तपास सुरू केला आहे.
आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उधमपूरमधील सलाथिया चौकात भाजीच्या स्टॉलजवळ संशयास्पद स्फोट झाला. दसरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटात मृत्यू झाल्याची अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
तसेच स्फोटात जखमी झालेल्यांमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारासाठी उधमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची घटना घडताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पोहोचले. मात्र हा स्फोट कसा झाला याबाबत सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे.