पल्ली व कोयनगुडा येथे व्यसन उपचार क्लिनिक

167

– २७ रुग्णांनी घेतला पूर्ण उपचार
The गडविश्व
भामरागड : शहरातील कोयनगुडा वार्डात व पल्ली येथे नागरिकांच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 27 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला व दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने कोयनगुडा वार्डात एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकच्या माध्यमातून 10 रुग्णांनी तर पल्ली येथील क्लिनिकमध्ये 17 रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही क्लिनिकमध्ये रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथचे आबिद शेख यांनी केले. कोयनगुडा येथे नगरसेवक अशोक गायकवाड, वासुदेव हबका, नागो नरोटी, वार्डातील सामाजिक कार्यकर्ते व वॉर्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पल्ली येथील क्लिनिकच्या यशस्वीतेसाठी संघटनेकडून गाव पाटील रामपुरी मांजी, दशरथ मांजी, लचिधर बाकडा यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here