The गडविश्व
सावली : भाजपा सावली तालुक्याच्या वतीने चार राज्यात विजय मिळवल्या बद्दल फटाके फोडून, पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी सावली तालुक्याच्या वतीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मनिपुर येथे भारतीय जनता पार्टी घवघवीत यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सावली तालुका च्या वतीने सावली तालुका भाजपा अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव फटाके फोडून, पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला.
यावेळी नगरसेविका निलम सुरमवार, भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, पं.स सदस्या छायाताई शेंडे, भाजप महिला शहराध्यक्ष गुड्डी सहारे, चांदली सरपंच विठ्ठल येगावार, भाजप जेष्ठ नेते प्रकाश खजांची, अशोक आकुलवार, युवा तालुका सचिव अंकुश भोपये, निखिल सुरमवार, हरीश जक्कुलवार, राकेश कोंडबतुनवार, मोतीराम चिमुरकर, मुक्तेश्वर थोराक, आदर्श कुडकेलवार, इम्रान शेख, मयूर गुरुनुले, शुभम मेश्राम, शरद सोनवणे, पारस नागपुरे, कमलाकर बटे, तुकाराम कोंडेकर आदि भाजपा तालुका पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.