The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली यांच्या ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाद्वारे “जागतिक महिला दिनानिमित्त” तीन दिवसीय विविध कार्यक्रमाअंतर्गत ८ मार्च २०२२ रोजी “महिलांसाठी कायदे व विविध योजना” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाबाई व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुष्पार्पण करून करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या सुपर मॉडेल सौ.मनीषा मडावी आणि कायदेविषयक समुपदेशक आणि समाज कार्यकर्ती श्रीमती वर्षा मनवर उपस्थित होते.
याप्रसंगी माननीय श्रीमती वर्षा मनवर यांनी स्त्रियांवरील अत्याचार, त्याविषयी विविध कायदे व कायद्याचा दुरुपयोग याविषयी सविस्तर माहिती व्याख्यानात देण्यात आली तर प्रमुख पाहुणे श्रीमती मनीषा मडावी यांनी मानवनिर्मित जीवनशैलीत स्त्री अनेक भूमिका बजावून नवचैतन्य निर्माण करते असे मत व्यक्त केले तसेच आपला सुपर मॉडेल पर्यंतचा प्रवास वर्णन केला.
महिला दिनाच्या शुभेच्छा व मान्यवरांच्या हस्ते केक कटिंग करून महिला दिन साजरा करण्यात आला तसेच रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस कु. निकिता राजेंद्र अंडलकर, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु. हर्षदा वसंत मानकर, तृतीय क्रमांकाचे बक्षीस कु. काजल राजेश वाटे या विजेत्यांना व प्रोत्साहनपर घोषवाक्या करिता कु. अश्विनी छत्रपती बावणे हिला प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ग्रंथालय व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तिडके, महिला कक्ष प्रमुख प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा. कविता उईके, कु. अनिता ठाकूर, कु. कादंबरी केदार, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी व विस्तार ग्रंथालयाचे महिला सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.