– नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची राज्याच्या अर्थसंकल्पात माहिती
The गडविश्व
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य, शेती,वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास आशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्पात राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत. यात गडचिरोलीसह शिर्डी, रत्नागिरी अमरावती, कोल्हापूर विमानतळाचा समावेश आहे. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला हे अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. यामुळे राज्यातल्या माल वाहतूक आणि इतर वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. शिर्डीच्या विमानतळाच्या विकास कामाकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली आहे.अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनल उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसचे गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीच प्रस्ताव विचाराधीन आहे तर कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन विमानतळे आणि विमानतळांचा विस्तार हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नवीन विमानतळामुळे वाहतुकीचे जाळे आणखी मजबूत होऊन महाराष्ट्र देश विदेशाशी जोडला जाणार आहे हे विशेष.