The गडविश्व
गडचिरोली : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला लक्षवेध अकॅडमीचे संचालक प्रा.राजीव खोबरे, प्रा.आशिष नंदनवार हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहरकर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या लोखंडे मॅडम, गडचिरोली पोलीस स्टेशन वाहतूक शाखेच्या सौ. कोडापे मॅडम, कुमारी शालू मेश्राम हजर होते. यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत अकॅडमीचे संचालक यांच्याकडून पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन कु. मनीषा गंगापुरीवार या विद्यार्थिनीने तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रणजीत, आभार कु आचल चौधरी या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कडते, कपिल आकुदर, कुणाल औतकर, विशाल बावणे, आदित्य नमुलवार व अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.