– धनादेशाचे केले वितरण
The गडविश्व
गडचिरोली : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकुळ माजवला होता. या काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्तीचा अचानक निधन झाल्याने परिवारासमोर मोठे दुःखाचे डोंगर उभे झाले. त्यामुळे त्या परिवाराला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. मात्र सह्याद्री फाउंडेशनने कोरोनाकाळात मुत्यू पावलेल्या अश्या वंचित व गरीब परिवाराला आधार देण्याकरिता हात पुढे करत विधवा महिलाना सह्याद्री फाउंडेशन च्या माध्यमातून ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्या माध्यमातून ११ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ४७ लाभार्थींना गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांचे हस्ते गडचिरोली दि. जिल्हा मध्यवर्ती को ऑप. बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील लाभार्थीना आर्थिक मदतीचा धनादेश व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्याकाळात मृत्यू झालेल्या परिवाराच्या पाठीशी जिल्हा प्रशासन असल्याचे व पीडित परिवारांना प्रशासनामार्फत मदत करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी यावेळी बोलताना दिले. तसेच सह्याद्री फाउंडेशन मार्फत गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थीना मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते विजय शृंगारपवार, सह्याद्री फाउंडेशन नागपूर चे अध्यक्ष विजय क्षिरसागर, आरोग्य प्रबोधिनी व जिल्हा निमंत्रक, महाराष्ट्र कोरोना एकल पुनर्वसन समितीचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश गभने प्रामुख्याने उपस्थित होत. या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सह्याद्री फाउंडेशनचे धीरज उमाठे, प्रज्वल मुके, कुणाल शाहू यांनी परिश्रम घेतले.