गडचिरोली : कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

450

– गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व कृषी विज्ञान केंद्र (आत्मा) गडचिरोलीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील शेतकरी पारंपारीक पिक पद्धतीचा वापर करीत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेले असुन चांगल्या दर्जाचे जीवनमान जगु शकत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योगासाठी वाव देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतुन व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे संयुक्त विदयमाने ३ दिवसीय कुक्कुटपालनाचे अदयावत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण काल १५ मार्च २०२२ रोजी पुर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला.
सदर कुक्कुटपालन प्रशिक्षणात पोस्टे धानोरा, जारावंडी, चामोर्शी, पोमके पोटेगाव, चातगाव कार्यक्षेत्रातील दुर्गम भागातील ५१ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान आकापुर, ता. मुल, जि. चंद्रपुर येथील पोल्ट्री फॉर्म दाखविण्यात येवून त्यांना कुक्कुट पक्षांची (पिल्लांची) जोपासणा कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व काल १५ मार्च रोजी प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दरम्यान हजर असलेल्या ५१ शेतकऱ्यांना सातपुडा जातीचे प्रत्येकी १५ पिल्ले व कुक्कुटपालनाकरीता उपयोगात येणारे साहीत्य तसेच खाद्य मोफत वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणील गिल्डा यांनी दर्शविली. तसेच कार्यक्रमास प्रकल्प संचालक आत्मा संदीप कऱ्हाडे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम कदम, विषय विशेषज्ञ (अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड यांचीही उपस्थिती लाभली. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आतापर्यंत बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांच्या सहकार्याने ब्युटीपॉर्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुफ्फुटपालन ३९४, शेळीपालन ६७, लेडीज टेलर ३५, फोटोग्रॉफी- ३५, मधुमक्षिका पालन- ३२, भाजीपाला लागवड ३४० तसेच टू व्हिलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण ३७० पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ७८०, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३० मोटार सायकल दुरुस्ती ३४ अशा एकुण २३१७ युवक-युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कुकुटपालन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील धानोरा, एटापल्ली, पेंढरी, गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार तसेच कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here