The गडविश्व
सावली : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रनात सावली तालुक्यात SCALE – KCF कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम चालू वर्ष 2022 पासून राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाची माहिती पंचायत समिती सावलीच्या शिक्षण विभागाला व्हावी जेणेकरून कार्यक्रम तालुक्यात यशस्वीरित्या राबविला जाईल, त्याकरीता दिनांक १४-०३-२०२२ रोज सोमवार ला पंचायत समिती सावली येथे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषयतज्ञ इत्यादींच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते..
कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. सुनीता मरस्कोल्हे गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली यांची उपस्थिती होती तसेच सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजयजी कोरेवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सावली पंचायात समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग कुंभरे यांची उपस्थिती होती तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मॅजिक बस चंद्रपूरचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांची उपस्थिती होती..
कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थितांना मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच SCALE कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो व त्याचे महत्व पटवून देण्यात आले..कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन सावली तालुका समन्वयक आकाश गेडाम, शाळा सहाय्यक अधिकारी मंगेश रामटेके , दिनेश कामतवार व शुभांगी रामगोणवार यांनी प्रयत्न केले.