– सहावी ते बारावी।पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय
The गडविश्व
गांधीनगर : शालेय विद्यार्थ्याना श्रीमद् भगवत् गीतेचे ज्ञान असावे, यासाठी गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळांमध्ये गीता शिकवली जाणार आहे. सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना गीतेमधील संस्कार आणि तत्वांबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गीतेला पाठ्यक्रमासोबतच प्रार्थना आणि इतर कार्यक्रमांमध्येही सामिल केले जाणार आहे. गुजरात सरकारने नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत श्रीमद् भगवत् गीत पाठ्यक्रमात शिकवली जाणार असल्याची घोषणा केली. हे धोरण 2022-23 पासून सुरू करण्यात येणार आहे.
पाठ्यक्रमाअंतर्गत शाळांमध्ये गीतेवर आधारीत विविध स्पर्धा आणि रचना जसे की, श्लोक, निबंध, नाटक, चित्रकला, प्रश्नउत्तरे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्याससाहित्य प्रिंट, ऑडिओ आणि व्हुज्युअल फॉरमॅटमध्ये देण्यात येईल.