– उद्या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
The गडविश्व
गडचिरोली :। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या २१ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आहे. याचे औचित्य साधून गडचिरोली शिवसेना शहर शाखेतर्फे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिवजन्मोत्सव सोहळा शहरातील शिवसेना जिल्हा कार्यालयात सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झेंडा वंदन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी शिवसेना जिल्हा कार्यालयातून ते इंदिरा गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, गांधी चौक, बेसिक शाळा, वंजारी मोहल्ला, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, आरमोरी रोड, परत इंदिरा गांधी चौकातून शिवसेना कार्यालयापर्यंत मिरवणूक रॅली काढण्यात येणार आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.