The गडविश्व
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभेत धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादकांसाठी ६०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मोठी घोषणा केली आहे.
विधानसभेत विरोधी पक्षाने धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादनकांना बोनस आम्ही देणार नाही. कारण ती मदत शेतकऱ्यांना पोहोचत नाही. दलाल त्यात पैसे घेतात. एकरमागे काही मदत द्यायचा प्रयत्न आम्ही करु, असे सांगत ६०० कोटी रूपये पॅकेज देवू पण बोनस नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात मोबाईलवरून ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे. आता ३१ मार्चपर्यंत पीक पहाणी नोंदवता येणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही.
शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे अर्थमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी आज विधानसभेत सांगितले. https://t.co/lLbhLNzrqm
— NCP (@NCPspeaks) March 21, 2022