ग्रामपंचायत मौशिखांब येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर संपन्न

398

The गडविश्व
अमिर्झा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, पंचायत समिती गडचिरोली व गट ग्रामपंचायत मौशिखांब यांच्या संयुक्त विद्यमाने काल २३ मार्च रोजी ग्रामपंचायत मौशिखांब येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव डी.डी. फुलझेले तसेच पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी मुकेश माहोर तसेच गडचिरोलीच्या समाजसेविका तथा विधी स्वयंसेविका कु. वर्षा मनवर, माजी जि. प. सदस्यां सौ. कुसुमताई अलाम, सरपंचा सौ. रंजीता पेंदाम, उपसरपंचा सौ. गांधरवार तसेच संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी ग्रामस्थाना कायदेविषयक शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here