– याच्याकडे सोपविली कॅप्टन्सीची जबाबदारी
The गडविश्व
मुंबई : आयपीएलचा १५ वा मोसम २६ मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामासाठी अवघे काही तास शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मोठा निर्णय घेतला आहे. धोनीने चेन्नईचे कर्णधार पदाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धोनीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. चेन्नईने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ चेन्नईचे नेतृत्व केले आहे. तर काही मोसमासाठी पुण्याची कॅप्टन्सी केली. धोनीने आयपीएलच्या इतिहासात एकूण २०४ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे . यामध्ये त्याने आपल्या कॅप्टन्सीत १२१ मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. धोनीची विजयी टक्केवारी ही ५९.६० टक्के इतकी राहिली आहे.
📑 Official Statement 📑#WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022