– माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
The गडविश्व
सिरोंचा : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या तुमनूर येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
नवीन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला उदघाटन म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार होते. तर अध्यक्ष म्हणून सरपंच किष्टाय्या गुरुसिंग, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंचा बबिता किरण वेमूला, संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे, बाल विकास अधिकारी अनिलकुमार पटले, तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे, आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम नगरपंचायत सिरोंचा उपाध्यक्ष बबलू पाशा, किरण वेमूला, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी सिडाम,कांताराव सोदारी,वेंकटेश दुर्गम, आविसं सोशल मीडिया प्रमुख तिरुपती चिट्याला,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते
तुमनूर येथे ग्रामपंचायत भवन नसल्याची माहित आविसंचे किरण वेमूला यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळविले होते त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी तुमनूर येथे ग्रामपंचायत साठी नवीन इमारत मंजुरी देऊन काल नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे माध्यमातुन विविध प्रकारचे निधी उपलब्ध करून ग्रामीण भागाचा विकास करू असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उदघाटनीय भाषणेत बोलतांना केले. यावेळी मंचावर उपस्थित इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.
यावेळी पोलीस पाटील राजमाल्लू वेमूला, राजमाल्लू सुंकारी, सडवली वेमूला, कोंडाय्या कंदीकटला, संतोष भीमकरी, गट्टू सिडाम, महेश गोरा, रुपेश वेमूला, राजबापू सिरांगी, राजबापू ओद्दी,सत्यम गोरा, विशाल, सुरज लग्गासह तुमनूर परिसरातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.