श्रमदानातुन राष्ट्र पर्यायाने देश घडविण्याला हातभार लावणे काळाची गरज : आमदार कृष्णा गजबे

357

The गडविश्व
देसाईगंज : “गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुन देशाची परीक्षा, गावचि भंगता अवदशा- येईल देशा या राष्ट्रसंत तुकडोजी महारांजी दिलेल्या मुलमंञानुसार देशाला प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल तर गावाची,पर्यायाने समाजाची दशा सुधारणे अत्यावश्यक आहे.सर्वच कामे शासकीय स्तरावरुन शक्य नसल्याने श्रमदानातुन राष्ट्र पर्यायाने देश घडविण्याला हातभार लावणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

ते देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली अंतग॔त आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सात दिवशीय कोविड मुक्त समाज, लोकशाही करीता युवा शक्ती व श्रमसंस्कार शिबीराच्या समारोपनिय कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी नुतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजचे अध्यक्ष केवळराम घोरमोडे, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, सचिव मोतिलाल कुकरेजा, सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल, सदस्य दिलीप ढोरे, डाॅ.इंदरप्रित टुटेजा, योगेश नाकतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा, नानक कुकरेजा, डाॅ.एस.जी. गहाणे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात आमदार गजबे पुढे बोलताना म्हणाले की श्रमसंस्कार शिबीरातुन भविष्याची गरज लक्षात घेता नियोजन करणे शक्य आहे. नियोजन करताना कमी खर्चात विकास कसा साधता येईल याबाबत यथायोग्य माहिती प्राप्त करता येत असल्याने व श्रमदान केल्याने गावासाठी काही तरी केल्याचा मौलिक आनंद मिळत असल्याने त्या दिशेने स्थानिक नागरिकांनी पाऊल टाकणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here