दहावीचा पेपर सुरु असतांना विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला

800

– हल्ल्यात १३ विद्यार्थी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

The गडविश्व
बुलडाणा : दहावीचा पेपर सुरू असतांना मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. या मधमाशांच्या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन कॉन्व्हेंट मध्ये आज दहावीचा पेपर असल्याने विद्यार्थी या शाळेत पेपर देण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी वेळेवर पेपर सुरू होणार म्हणून सर्व विद्यार्थी वेळेवर हजर होते. पण अचानक अचानक मधमाश्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला यावेळी विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. मधमाशांचा हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी इकडे तिकडे पळत सुटले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मधमामाश्यांच्या हल्ल्यात तब्बल १३ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here