नक्षल्यांनी घडवून आणला आयईडी स्फोट : दोन जवान जखमी

908

– जखमी जवानांना रुग्णालयात उपचाराकरिता केले दाखल, दोन आयईडी स्फोट
The गडविश्व
नारायणपूर : जिल्ह्यातील कुरुस्नार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षल सप्ताह दरम्यान शोधमोहिम राबवित असतांना नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सनौ वड्डे, रामजी पोटाई असे स्फोटात जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत. या घटनेला एसपी सदानंद कुमार यांनी दुजोरा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज २९ मार्च रोजी नक्षल्यांच्या साम्राज्यवादी विरोधी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी DRG आणि ITBP च्या जवानांनी कोडोली आणि झारावाहिच्या दिशेने शोध घेतला. दरम्यान नक्षल्यांना परिसरात पोलीस जवान आल्याची माहिती मिळाली असता २ आयईडी पेरून ठेवले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास शोध सुरू असतांना एक डीआरजी जवानाचा पाय आईडीवर पडला व मोठा स्फोट झाला. दरम्यान काही सेकंदातच दुसऱ्या आयईडीचाही स्फोट झाला. यात दोन जवान जखमी झाले. त्यांनां तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर घटनेनंतर परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here