– कोरची तालुक्यातील ४०शाळांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत कोरची तालुक्यातील विविध गावांतील एकूण ४० शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. तसेच ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला.
कोरची तालुक्यातील सावली, बेडगाव २ शाळा, कोरची येथील जिप शाळा, शासकीय आश्रम शाळा, पार्वताबाई हायस्कूल, श्रीराम हायस्कुल, जांभळी, पडीयाजाँब, कोचिनारा, टेमली, मोहगांव, बेतकाठी, नवरगाव, भिमपुर जिप शाळा व युवास्पंदन हायस्कूल, बिहीटेकाला, सोहले खडका, मसेली येथील जिप शाळा, आश्रम शाळा शाळा, छत्रपती हायस्कूल, बोटेकसा येथील भगवंराव हायस्कूल, बोलेना, बेल्लरगोंदी, साल्हे, घुगवा, काळे, दवंडी, पकनभट्टी, कुमकोट, सातपुती, कोहका, दोडके, भुर्यालदंड, झेंडेपार, नांदळी, जामनारा, अल्लीटोला, कोटगुल, बोदालदंड अशा एकुण ३५ गावांतील ४० शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आले होते. यामध्ये तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. गीत, तार टपाल टेलिफोन, डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. व्यसनमुक्त गाव निर्माण करण्यासाठी बाल सैनिकांची निवड करण्यात आली. तसेच आमची शाळा तंबाखूमुक्त करु असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे. असे विविध उपक्रम घेत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.