– पल्ली व खोब्रामेंढा येथे क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली : दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार भामरागड तालुक्यातील पल्ली व कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले होते. यामाध्यमातून २६ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे.
भामरागड तालुक्यातील पल्ली येथे ११ रुग्णांनी नोंदणी केली तर जुन्या दोन रुग्णांसह एकूण १३ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. दरम्यान संयोजिका पुजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम व धोक्याचे घटक सांगितले. साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन तालुका प्रतिनिधी आबिद शेख यांनी केले. गाव संघटनेकडून गाव पाटील रामपुरी मांझी, लाचिंधर राणा व महागु यांनी सहकार्य केले. कुरखेड़ा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील शिबीराच्या माध्यमातून १३ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. प्राजु गायकवाड यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. प्रभाकर केळझरकर यांनी केस हिष्ट्री घेतली. रुग्णांची नोंदणी तालुका संघटक मयूर राउत यांनी केली तर नियोजन तालुका प्रेरक विनोद पांडे यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनचे पदाधिकारी सरपंच जासवंदा धुर्वे, उपसरपंच शेषराव कल्लो, पोलिस पाटील प्रफुल कल्लो, ग्रामसेवक अंबादे यांनी सहकार्य केले.