The गडविश्व
देसाईगंज : धान पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याची घटना काल ६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चोप येथे घडली. या घटनेमुळे परीसरात खळबळ निर्माण झाली आहे. पंढरी बोंडकु नाकाडे (५७) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
गाढवी नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी धान पिक घेतात. काल ६ एप्रिल रोजी अचानक चोप येथील पंढरी नाकाडे या शेतकऱ्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने एकच खळबळ माजली.घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्याला प्राप्त होताच पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी इनामदार, नंदेश्वर यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथे पाठविला. पुढील तपास देसाईगंज पोलिस करत आहे.