The गडविश्व
भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील कु.मीना सिडाम हिची हत्या करण्यात आली व काल ६ एप्रिल रोजी तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळून आला.
आज ७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज गेर्रा येथे सिडाम परिवाराच्या घरी भेट देवून सांत्वन केले व आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, अहेरी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, पं.स.भामरागडचे माजी उपसभापती लालसु आत्राम, पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, पोलीस पाटील क्रिष्णा सिडाम, चिन्नू सड़मेक, गणेश नागपूरवार, दिनेश जुमडे आदि उपस्थित होते.