The गडविश्व
गडचिरोली : तालुका स्तरावर इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी, नीट, जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेच अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबीर महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११. ०० वाजता आयोजीत करण्यात येत आहे.
तरी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक व लिपीक यांनी सदर प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली देवसुदन धारगावे यांनी केले आहे.