अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत विविध योजनेकरीता अर्ज आमंत्रित

470

The गडविश्व
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत Borewell / Dugwell /with solar Pumps ( 5 HP) for irrigation of land given under FRA 2006 ही योजना मंजूर आहे.
प्रकल्प कार्यालय गडचिरोली करीता ७ लाभार्थ्यांकरीता ४३. ७५ लक्ष निश्चिीत करण्यात आलेली असुन या कार्यालय अंतर्गत येत असलेले, गडचिरोली,चामोर्शी,धानोरा,आरमोरी,कुरखेडा,वडसा,कोरची, तालुक्यातील वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झालेले अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी जास्ती जास्त अर्ज २९ एप्रिल २०२२ पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावे.

योजनेकरीता आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे

रहिवासी दाखला,जातीचा दाखला,वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र,या पुर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र,विहीर/बोअरवेल प्रस्तावित असल्याच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र,किमान जमीन इत्यादी कागदपत्रे ( 7/12 व नकाशा), विधवा महिला शेतकरी,अंपग शेतकरी यांना प्राधान्य देण्याबाबत समिती निर्णय घेईल. असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली आशिष येरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here