माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

597

– जाफ्राबाद येथे शेतकरी सी. सी. वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील जाफ्राबाद येथे शेतकरी क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भगवंतराव हायस्कूल क्रिंडागणात करण्यात आले होते या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आले.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार ३१ हजार रोख रक्कम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचेकडून तर द्वितीय पुरस्कार २५ हजार रोख रक्कम आविस तालुका अध्यक्ष बानायाभाऊ जनगाम यांचेकडुन, तृतीय पुरस्कार २० हजार रुपये रोख रक्कम सिरोचा पं. स. च्या मजा सदस्या सरीता पेद्दी, सरपंच बापु सडमेक, उपसरपंच तिरुपती दुर्गम यांचेकडून देण्यात येणार आहे.
उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाफ्राबाद चे सरपंच बापु सडमेक तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर पेद्दी, संतोस अंबिलपु आविस कार्यकर्ते, उपसरपंच तिरूपती दुर्गम , विशेष पाहुणे प्रा. आ. केद्र टेकडा ताला चे डाॅ. सचिन मडावी, जे ए सरकार भगवंतराव हाय. टेकडाताला, विजय रेपालवार, एम एल डोगरे, अशोक मुडमाडीगेला, रवि बारसागडी व शेतकरी सी. सी. मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here