– ग्रामसभांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली : जे प्रशिक्षण तुम्ही या प्रशिक्षण कार्यक्रमातून घेणार आहात त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. इतर ग्रामसभांना देखील याची माहिती द्यायची आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग तुम्ही कसा करता ? इतर ग्राम सभांना त्याचा उपयोग होतो आहे कि नाही ? गावात तुम्ही याचे इम्प्लिमेंट कसे करता ? त्याचा फॉलोअप आम्ही घेणार आहोत. यातूनच मास्टर ट्रनर म्हणून तुम्हाला काम करायचे आहे. गौण वनोपज आधारित प्रकल्पामधून काही सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजे. ज्यांचा आदर्श इतरही ग्रामसभा घेतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौण वनोपज आधारित प्रकल्पा करिता ग्रामसभांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन काल विद्यापीठ सभागृहात पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे. आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, गौण वनोपजांच्या संदर्भात ग्रामसभांना प्रशिक्षित करणे आणि तुमची क्षमता वाढवणे , तुमचा आर्थिक स्तर उंचावणे हा या प्रशिक्षणा मागचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात उपयोग करून या संधीचे सोने तुम्हाला करायचे आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटना दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीना यांनी ग्रामसभा सदस्यांशी संवाद साधला आणि या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेतला. ज्यांनी अर्ध्यातून शिक्षण सोडले आहे .त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करायला हवे आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. निती आयोगाचे सिईओ अमिताभ कांत यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ.अनिल झेड. चिताडे यांनी केले . या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी संचालन करून आभार मानले. या प्रशिक्षणाकरिता देवाजी तोफा, डॉ. सतीश गोगुलवार, कुंदन दुपारे ,नियाज मुलानी, मंगेश भानारकर ,रुपेन्द्र कुमार गौर या प्रशिक्षण कार्यक्रमा करीता अथक परिश्रम घेत आहेत.