चारचाकी वाहनासह ४ लाख ४२ हजारांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

605

– दोन आरोपी ताब्यात, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
The गडविश्व
वर्धा :चारचाकी वाहनातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना पोलीस स्टेशन देवळी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने चार चाकी वाहनासह ४ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल नरेंद्र तायवाडे (२७) रा. ब्राह्मणपुरा वार्ड क्रमांक ९ देवळी, संजय भूतूजी तेलकर (२१) रा. देशमुखपुरा वार्ड क्रमांक १७ देवळी असे आरोपींची नावे आहेत. सदर कारवाई ११ एप्रिल रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. जिल्ह्यातील देवळी तालुक्यात देशी-विदेशी दारू अवैधरित्या चारचाकी वाहनाने येत असल्याबाबत मुखबीराकडून खात्रीशीर माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे देवळी येथील यशोदा नदीचे यवतमाळ-देवळी हायवे पुलावर सापळा रचून नाकेबंदी केली. यादरम्यान एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट एमएच ३२ सी-६९८५ क्रमांकाची चारचाकी वाहन येत असल्याचे दिसून आले. त्या वाहनाला थांबवून वाहनांची झडती घेतली असता त्यात देशी-विदेशी दारू किंमत ४२ हजार ६०० रुपये व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी वाहन किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पूलगाव गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात परी. पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या निर्देशाप्रमाणे देवळी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदार कुणाल हिवसे, उमेश गेडाम, अनिल तिवारी, दयाल धावणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here