The गडविश्व
धानोरा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल येथे १४ एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य डी. टी. कोहाडे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी व्ही. आर. अरवेली, विशेष अतिथी पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, एस. एम. रत्नागिरी, कु. रजनी मडावी, कु. रश्मी डोके, कोरेवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी रश्मी डोके यांनी डॉ. बाबासाहेबाच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कोहाडे यांनी बाबासाहेब यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून सर्वांनी जास्तीत जास्त पुस्तकाचे वाचन करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन पी.बी. तोटावार तर आभार बादल वारघंटीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नववीच्या विद्यार्थ्यांनी तसेच कर्मचारी वृन्दानी सहकार्य केले.