धक्कादायक : नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने पत्नीची केली निर्घृण हत्या

812

The गडविश्व
ठाणे : नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास भायंदर पूर्वच्या फाटक रोड परिसरात घडली.
पत्नीने नाश्त्या तयार करून पतीला दिला मात्र नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने त्याने आपल्या पत्नीची हत्या केली.या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निलेश घाघ (४६) असे आरोपी पतीचे असे आरोपी पतीचे नाव आहे.
निलेश घाघ याने नाश्ता केल्यानंतर सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्याने आपली पत्नी निर्मला यांची गळा आवळून हत्या केली. आरोपी पत्नीने वाढलेल्या खिचडीमध्ये मीठ कमी असल्याने नाराज होता. याचमुळे त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आरोपीविरोधात भायंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here