The गडविश्व
गडचिरोली : आजादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत असून २१ एप्रिल २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक, भिषक, नेत्र चिकित्सक, सर्जन, बालरोग तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ज्ञ, आदी विशेषतज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून रुग्णांना रुग्णसेवा देणार आहे. असे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी यांनी कळविले आहे.