– सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगाराने आरोपीला पकडले
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर चे दार तोडून संगणक चोरी करून नेतांना दोघांना सुरक्षारक्षक आणि सफाई कामगाराने रंगेहात पकडल्याची घटना काल सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्वप्निल दिलीप भोयर (२८), मंगेश देविदास चौधरी (२४) दोन्ही रा.कोटगल गडचिरोली यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त महितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मधील भरदिवसा सकाळी १० वाजताच्या सुमारास दार तोडून संगणक चोरी करून नेतांना त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगाराला दिसले. दरम्यान कोणताही विलंब न करता सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगाराने दोघाही आरोपीला रंगेहात पकडले व पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील बेसरकर, पोहवा रमेश उसेंडी करीत आहे.