The गडविश्व
सातारा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारे वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता सत्र न्यायालायने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाताना सातारा पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या आवारात पोलीस फौजफाटा होता.